मोठी बातमी : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं; आठही जण गंभीर जखमी

  • Written By: Published:
मोठी बातमी : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं; आठही जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आह. या विमानात सहा प्रवाशांसह दोन क्रू मेंबर होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आहे. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे. या भीषण अपघातात प्रवासी व पायलट, क्रू मेंबर असे आठ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी ही घटना घडली. (Private jet skids off Mumbai airport runway)

विशाखापट्टणमहून मुंबईला जाणारे VSR Ventures Learjet 45 हे विमान व्हीटी-डीबीएल मुंबई विमानतळावरील धावपट्टी 27 वर लँडिंग करत होते. त्यावेळी पहिल्यांदा हे विमान घसरले. त्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होती. त्यामुळे लँडिंगवेळी विमान धावपट्टीवरून घसरले. अपघातवेळी दृश्यमानता केवळ 700 मीटर असल्याचे DGCA ने म्हटले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून  विमानतळावरील उड्डाणे आणि आगमन पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्यात आले होते. आता विमानांचे उड्डाण सुरू करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त विमानातील आठ जण जखमी झाले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे. त्यात क्रू मेंबर, पाच प्रवासी व पायलट व को-पायलट असे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

धुव्र कोटक, के. के. कृष्णनदास, आक्राश शेठी, अरुण साली, कामाक्षी हे जखमी झाले आहेत. हे भारतीय आहेत. तर डेन्मार्कचे नागरिक लार्स सोरेनसेन हे जखमी झाले आहेत. तर पायलट सुनील व नेल हे दोघे जखमी आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube