CM Eknath Shinde on Mumbai Hit And Run Case : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच वरळीत आज पहाटे भीषण अपघात झाला. (Mumbai Hit And Run Case) दुचाकीवरून मासे घेऊन चाललेल्या वरळी कोळीवाड्यातील एका दाम्पत्याला बीएमडब्ल्यू वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी आरोपी चालक हा शिंदे गटाचे राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा असल्याचं समोर आलं. यानंतर पीडितांना न्याय देण्याची मागणी करत विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली.
चंद्रकांत पाटलांना नातेवाईक आणि सगेसोयरे यातील फरक कळतो का? जरांगे पाटलांचे टीकास्त्र
यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या घटनेवर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत झालेला अपघात दुर्दैवी आहे. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या घटनेत जो कोणी आरोपी असेल, त्याला सरकार पाठीशी घालणार नाही. या सरकारमध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो वा कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यासमोर सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘पापाचा घडा लपवण्यासाठी योजनांचं पांघरून…’; लाडकी बहिण योजनेवरून ठाकरेंचा हल्लाबोल
यासोबतच अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी सरकार आणि गृह विभाग निश्चितपणे योग्य ती पावले उचलेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
नेमकी घटना काय?
वरळीत पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. या त्या महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी शिंदे गटाचे राजेश शहा यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या मुलावर आणि ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला आहे.