Download App

‘आधी माफ केलं पण आता नाही’; वर्षा गायकवाडांची संजय निरुपमांना ताकीद

Image Credit: Letsupp

Varsha Gaikwad On Sanjay Nirupam : काँग्रेसने आधी तुम्हाला माफ केलं पण आता करणार नाही, या शब्दांत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना ताकीद दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाबाबत विधान केल्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसच्या (Congress) हायकमांडकडून सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधत निरुपण यांनी आरोप केले आहेत. निरुपमांच्या आरोपांनंतर वर्षा गायकवाडांनी ट्विट करीत ताकीद दिली आहे.

दहा वर्षात मोदींनी शेतकऱ्यांचा काय विकास केला? त्यांनी फक्त….; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

वर्षा गायकवाड म्हणाल्या, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्याएवढी तुमची लायकी नाही. अनेकदा काँग्रेसने तुमच्या बडबडीला माफ केलं पण आता नाही. यापुढे काँग्रेस तुमच्या बडबडीला माफ करणार नाही, अशी ताकीदच वर्षा गायकवाड यांनी संजय निरुपम यांना दिली आहे. तसेच संजय निरुपम यांच्याविषयी याआधीच्या काळातही अनेक तक्रारी होत्या पण आम्ही त्यांना सांभाळून घेतलं पण आता नाही, असंही वर्षा गायकवाड ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

काँग्रेसला टोचणारी ठाकरे-राऊतांची दोन वक्तव्ये; ‘सांगली’ काँग्रेसच्या हाताला लागणार नाही?

काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं आहे. यासोबतच काँग्रेसचे भवितव्य संपले आहे. सध्या भारतात सोन्याच्या किमती, लाकडाचे वय आणि मोदीजींची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचंही ते म्हणाले. त्यावरुनही वर्षा गायकवाड यांनी संजय निरुपम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला श्रीरामाविषयी नाहीतर नथुरामाविषयी आक्षेप असल्याचं सडेतोड उत्तर वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

काय म्हणाले संजय निरुपम?
सध्या काँग्रेसची 5 सत्ताकेंद्रे आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जून खर्गे, के.सी वेणुगोपाल अशी 5 सत्ताकेंद्रे आहेत. हे पाच जण आपापसांत भांडतात, असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. तसेच संजय निरुपम यांनी जय श्री रामच्या जयघोषाने प्रेसची सुरुवात केली. अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी लोकांना आमंत्रित केले जात असताना एकट्या काँग्रेसने या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले होते. राम मंदिर सोहळा हा भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगितले आणि काँग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारले असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

follow us

वेब स्टोरीज