Download App

अखेर सरकारला आली जाग ! धोकादायक कंपन्या डोंबिवलीतून हलविणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

एकनाथ शिंदे: नागरिकांनी या यूनिट संबंधी तक्रारी केल्या होत्या. दुर्देवाने काळजी घेतली गेली नाही. इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिटने ऑडिट करणे गरजेचे.

  • Written By: Last Updated:

Dombivli MIDC chemical factory blast: डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivli MIDC) अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. यात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 60 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या भागात असलेल्या धोकादायक कंपन्या या सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.

पुणे पोर्श अपघात प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन? अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांची चौकशी होणार…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अमुदान कंपन्याच्या रिअॅक्टरचा मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळे शेजारच्या पाच-सहा कंपन्यांना आग लागली आहे. काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याची काम सुरू आहे. स्फोटाची तीव्रता जास्त आहे. यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जण अडकलेले आहेत. या भागात अतिधोकादायक कंपन्या आहेत. रेड कॅटगरीमधील या कंपन्या आहेत. या कंपन्यांची एबीसी अशा कॅटगरी करण्याचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रीयल सेफी युनिटला अधिक धोकादायक कंपन्या तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक कंपन्यांचे इंजिनिअरिंग, आयटी या क्षेत्रात रुपयांतरीत करता येईल. जिवितेला धोका असणारे उद्योग शहराबाहेर हलविण्याची परवानगी दिली आहे.

संजयकाका टेन्शनमध्ये; सांगलीत भाजपला पराभवाचा चाहूल लागलीय का?


नागरिकांच्या तक्रारीनंतर दखल नाही, अधिकारी गोत्यात

नागरिकांनी या यूनिट संबंधी तक्रारी केल्या होत्या. दुर्देवाने काळजी घेतली गेली नाही. इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिटने योग्य वेळी-वेळी ऑडिट करणे, सेफ्टी आॅडिट करणे आवश्यक होते. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांना कारवाई केली जाईल. कुणाला सोडणार नाहीत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. कुणाला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.


मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची आर्थिक मदत

या घटनेते मृत झालेल्यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल. तसेच जखमींचा उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाईल. तसेच मृतांना अधिक-अधिक नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

follow us