Ajit Pawar On Chief Minister Post: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, अशा शब्दात अजितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वाढत्या उन्हाचा पुणे शहराला फटका; मनपाकडून पाणी कपातीचा निर्णय, कोणत्या भागात कपात?
महाराष्ट्र महोत्सव-2025 मध्ये महाराष्ट्रातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आज महिलांचा गौरव करत आहोत हे सांगतानाच महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले आहे. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचे काम करत आहोत. लाडक्या बहिणीसाठी चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते, पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, असं ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभ्या केल्या आणि या राज्याला सुसंस्कृत राजकारण दिले. त्यांचा वारसा घेऊन काम करत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.
यावेळी राज्यसभेच्या तालिका सभापती म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल खासदार सुनेत्रा पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
महिला मुख्यमंत्री राज्याला मिळावा
कष्टकरी, कामगार महिलांना दादांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. दादा, आपण मनात आणले तर मुख्यमंत्री व्हाल. आपण राजकारण्यांनी 50 टक्के महिला आरक्षण दिलं, पण महिला मुख्यमंत्री राज्याला मिळावा, अशी मागणीही राही भिडे यांनी केली. दादा, आमचा तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असे काम करु अशी ग्वाही सोनाली कुलकर्णी यांनी दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनेत्रा पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.