Raj Thackeray meet Chief Minister Shinde : शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा, राज ठाकरे थेट मुखमंत्र्यांच्या भेटीला

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 07 07 At 6.18.40 PM

Raj Thackeray met Chief Minister Shinde : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. (Debt recovery for farmers, Raj Thackeray directly meets the Chief Minister)

राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका असे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 20 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा बॅंक सक्तीने वसुली करत असल्याचा मुद्दा चर्चीला गेला होता.

मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

आज झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

Tags

follow us