Download App

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! 300 नव्या लोकल्स ट्रेनला केंद्राकडून मंजुरी

  • Written By: Last Updated:

Indian Railway 300 New Locals For Mumbai : मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी (Indian Railway) खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स (Mumbai Local) दिल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

माझ्या नेतृत्वात 82 जागा निवडून आल्या अन् पटोलेंनी 82 च्या 16 केल्या; चव्हाणांचा टोला

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत 3 मोठ्या परियोजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणारा आहे. मुंबई लोकलमधून दररोज साडे सात लाख नागरिक प्रवास करतात, याच दृष्टीने केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.

ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने रेल्वेचे तीन मोठे प्रकल्प मंजूर करून जनतेच्या आणि विकासाच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार, अशी X अकाउंटवर पोस्ट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलीय. या प्रकल्पांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होईल. एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्राने मंजुरी दिलेल्या परियोजनांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर. मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय. रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय. जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल. मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जाणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.

 

follow us