Download App

Devendra Fadnavis : शिंदे अन् अजितदादांना सोबत का घेतलं? फडणवीसांनी सांगूनच टाकलं

Devendra Fadnavis : शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. दुसरीकडे वर्षभरानंतर अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. सरकार व्यवस्थित चाललं असताना अजितदादांना सामावून घेण्याची काहीच गरज नव्हती असा सूर त्यावेळी होता. शिंदे गटाने नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) अगदी जवळ आलेल्या असताना भाजपने या दोन्ही गटांना सोबत का घेतलं याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे. शिवसेनेशी भावनिक तर राष्ट्रवादीबरोबर धोरणात्मक युती केली, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत फडणवीसांनी उपस्थितांन मार्गदर्शन केले. पक्षाच्या नेत्यांनी संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल 

या बैठकीत फडणवीसांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही स्पष्ट शब्दांत फटकारले. पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे वाद आणि मतप्रदर्शन करू नका. वरिष्ठ नेत्यांकडे भूमिका मांडून सामोपचाराने वाद मिटवा. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन आजिबात करू नका,  साधेपणाने राहा असे फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यादृष्टीने तयारी करण्याची आता गरज आहे. महिला, शेतकरी, गरीब आणि युवकांवर जास्त लक्ष केंद्रीत करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

 

follow us

वेब स्टोरीज