Download App

मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती 

SSC Board Result Date : आज राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला असून यावेळी राज्याचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. बारावीचा निकाल जाहीर

SSC Board Result Date: आज राज्यात बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला असून यावेळी राज्याचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल (SSC Result) कधी जाहीर होणार असा प्रश्न आता विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

तर दुसरीकडे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी दहावीच्या निकालाबाबत मोठी माहिती दिली आहे. 27 मे रोजी दहावीचा निकाल लागू शकतो अशी माहिती त्यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यामुळे 27 मे रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. यावेळी दीपक केसरकर म्हणाले, आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून मी सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या परीक्षेत ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहे ते पुन्हा परीक्षेत बसू शकणार आहे. लवकरच परीक्षा होणार आहे. याबाबत सूचना देखील शिक्षण विभागाला करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर दहावीचा निकाल 27 मे ला निकाल लागू शकतो. असं देखील ते म्हणाले.

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे होते मात्र सुनावलेली शिक्षा आश्चर्यकारक, फडणवीसांची भूमिका

आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यावेळी राज्यात 93.37 टक्के विद्यार्थी पास झाले आहे. यावेळी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झाले आहे.

follow us