विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! उद्या बारावी बोर्डाचा निकाल; वाचा, निकाल कसा पाहायचा

विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! उद्या बारावी  बोर्डाचा निकाल; वाचा, निकाल कसा पाहायचा

Board 12th Result 2024 : Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दल अखेर घोषणा करण्यात आली आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत. (Board 12th Result) दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. तसंच, सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.

 

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार

1) mahresult.nic.in
2) results.gov.in.
3) hscresult.mkcl.org
4) hsc.mahresults.org.in
5) mahahsscboard.in

 

निकालाची टक्केवारी वाढण्याची चर्चा

या साईटवर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यकता आहे. यंदाच्या निकालात कोण बाजी मारणार हे उद्या कळणार आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढणार असल्याचीही मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, यंदा राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. सालाबादप्रमाणे यंदा देखील राज्यात संपूर्ण परीक्षा केंद्र कॉपीमुक्त पार पडली आहे.

 

लवकरच गोषणा होणार

दहाविच्या निकालाची घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. आता लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाबद्दलची देखील मोठी घोषणा केली जाऊ शकते. बोर्डाकडून अगोदरच हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, दहावीचा निकाल मे महिन्या च्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज