Video : बारावी परीक्षेत चांगले गुण…पण पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील आज…

Vaibhavi Santosh Deshmukh 12th Result : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला हादरला होता. खंडणी प्रकरणातून त्यांचा अत्यंत क्रूरपणे खून झाला. (Deshmukh) त्याची केस चालू आहे. मात्र, या काळात चर्चा झाली ती संतोष यांच्या लढवय्या मुलीची. ती म्हणजे वैभवी देशमुख. आभाळाएव्हढा बाप गेल्याचं दु:ख डोक्यावर घेऊन ही वैभवी व्यवस्थेशी लढताना दिसली. आजही तीचा लढा चालूच आहे. दरम्यान, याच वर्षी बारावीच वर्ष असल्याने त्याकडेही वैभवीने दुर्लक्ष केलं नाही हे आजच्या लागलेल्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. मात्र, हे यश सांगताना वैभवी आपल्या वडिलांच्या आठवणीत गहीवरली
बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने घवघवीत यश मिळवलं आहे. आपल्या वडिलांची हत्या झाल्यावर अत्यंत बिकट काळात अभ्यास करत ती परीक्षेला सामोरे गेली होती. या परीक्षेमध्ये वैभवीने ८५.3३% गुण मिळवले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर दोन महिन्यांनी वैभवीने बारावीची परीक्षा दिली होती. वैभवी देशमुख सायन्सला
मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी, ९१.८८ टक्के उत्तीर्ण, लातूर पॅटर्न फेल
आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत. माझी नीटची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे, त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. परंतु, मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता. त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसंच, एक आरोपी अद्यापही फरार आहेत त्याला देखील अटक केली जावी अशी मागणी देखील वैभवीने केली आहे.
कोणत्या विषयात किती गुण?
इंग्रजी ६३ गुण
मराठी ८३ गुण
मॅथमॅटिक्स ९४ गुण
फिजिक्स ८३ गुण
केमिस्ट्री ९१ गुण
बायोलॉजीमध्ये ९८ गुण
६०० पैकी ५१२ गुण वैभवीला मिळाले आहेत.
आज बारावीचा निकाल लागला. मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत अशी खंत वैभवी संतोष देशमुखने निकालानंतर व्यक्त केली.#VaibhaviSantoshDeshmukh #VaibhaviDeshmukh #12thresult pic.twitter.com/MUPkt9QawA
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 5, 2025