Shrikant Shinde Kalyan Melava : कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिवसेना युतीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविंद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आज कल्याणमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा झाला. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ठाकरे पिता-पुत्रासह राऊत कुटुंबालाही टार्गेट केल. जाहिरात वादावरून दोन्ही नेत्यांकडून पूर्णविराम देण्यात आल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक भूमिकेत दिसून आले. कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारक्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी खोक्यांपासून ते राऊतांपर्यंत आणि शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना आपल्या भावना आवरा. युती धर्म पाळा. एकत्र येऊन काम कराल तर काम चागल होतंय, अशा शब्दात खडेबोल सुनावले.
Letsupp Special : पक्ष बदलले पण वैर नाही! केदार विरुद्ध देशमुख संघर्षाची धार तीव्र होणार?
ते म्हणाले की, आजही ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत येत आहेत. कोरोनाकाळात दौरे करणारे आम्ही होतो असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार ह्ल्ला बोल केला. आधीचे सरकार घरी होते. मात्र, सध्याचं सरकार आपल्या दारी दारापर्यंत येत आहे. ठाकरेंकडे खूप वेळ होता. त्यामुळे ते पंढरपूरला गाडी चालवत जायचे, काँग्रेससोबत जाण्याआधी मी माझं दुकान बंद करेल, असं बाळासाहेबांनीच सांगितलं होतं ना? मात्र, हे सत्तेसाठी पायऊतार झाले, अशी टीकाही त्यांनी केली.
‘जोड मजबूत पण, तोंड विरुद्ध दिशेला, काय मजबूरी?’ मनसे आमदाराचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तळागाळात जाऊन काम करणारे आहेत. त्यामुळे घरी बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोलादेखील श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाला लगावला. शिंदे साहेबांनी सर्व काही लावून टाकले होते असे म्हणत शिंदेंना सरकार अस्तित्त्वात येईल की नाही याची थोडीदेखील कल्पना नव्हती असा दावा श्रीकांत शिंदेंनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, 370 कलम हटवले जावे, राममंदिर निर्माण व्हावे. ते स्वप्न पूर्ण करणाऱ्या भाजपसोबत अर्थात मोदींसोबत आम्ही गेलो तर काय चूकीचे केले? असा सवालही श्रीकांत शिंदेंनी यावेळी विचारचा.
महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? अजितदादांनी दिला महत्वाचा अपडेट
शिवसेनेला मुंबईतील नगरसेवकदेखील सांभाळता येत नाही, तुमच्या अडवणुकीमुळे लोक सोडून गेले, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. मुख्यमंत्र्यांनी निधीच्या रुपात खोके दिले खोके खोके म्हणून आम्हाला काही लोक हिणवतात. मला तर वाटते की, झोपेत देखील तसेच बरळत असतील असे म्हणत हो आम्ही खोके घेतले. पण निधीच्या रुपात ते आम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ज्यातून आम्ही विकासाचे काम करत असल्याचे शिंदे म्हणाले. अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहेत. कारण ते चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांची कामे होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे युतीचे सरकार करत आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’ बंगल्यावर प्रवेश नव्हता. आता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना जाता-येता येत. कारण ते सर्वांसाठी काम करतात. युतीत कोणताही वाद नाही, गेल्या काही दिवसांपासून युतीत वाद सुरू झाला असे भासवले जात आहे. पण आम्ही एका विचाराने एकत्र आलो आहोत. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही असे श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले.