‘जोड मजबूत पण, तोंड विरुद्ध दिशेला, काय मजबूरी?’ मनसे आमदाराचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला

‘जोड मजबूत पण, तोंड विरुद्ध दिशेला, काय मजबूरी?’ मनसे आमदाराचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला

Raju Patil : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आणि टीका अजूनही थांबलेल्या नाहीत. पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे जाहीरपणे सांगितल्यानंतरही राजकीय नेत्यांची वक्तव्ये थांबलेली नाहीत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खोचक ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे.

जोड मजबूत आहे आणि तोंड विरुद्ध दिशेला. काय मजबूरी असेल? कधी कधी जाहिरातींचे अर्थ काही कळत नाही बुवा असे ट्विट पाटील यांनी केले आहे. राजकीय अर्थ काढू नये अशी टीपही त्यांनी खाली दिली आहे. या ट्विटचे मात्र अनेक राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला होता. तिथूनच भाजप आणि शिंदे गटात वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर शिंदे गटाची जाहिरात आली. या जाहिरातीत कुठेच फडणवीस दिसत नव्हते. त्यामुळे वाद अधिकच वाढला. चूक लक्षात आल्यानंतर शिंदे गटाने दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, याकाळात विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली.

पालघर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदे या दोघांनीही वाद नसल्याचे जाहीर सभेत सांगितले होते. ये फेव्हिकॉल का जोड है, असेही शिंदे म्हणाले होते. त्यानंतर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विटही अनेक अर्थ काढत आहे. त्यांच्या या ट्विटवर भाजप किंवा शिंदे गट या दोघांपैकी कुणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

असे आहे ट्विट 

जोड ‘मजबूत’ आहे आणि तोंड ‘विरुद्ध’ दिशेला . काय ‘मजबूरी’ असेल ? कधी कधी जाहिरातींचे अर्थ काही कळत नाही बुवा.
(वि.सू.: कृपया ह्या शंकेचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube