Ghatkopar Hoarding Collapse Rescue Operation last phase 17 dead : मुंबईतील घाटकोपर मध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्याच्या वेगाने (Ghatkopar Hoarding Collapse) होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. त्यानंतर अद्याप देखील या घटनेमध्ये बचाव कार्य ( Rescue Operation ) सुरू आहे. मात्र हे बचाव कार्य अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू ( dead ) झाला आहे.
Athletics Federation Cup मध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी; आता नीरजचा भाला ऑलम्पिकसाठी सज्ज
आज ( 16 मे ) चौथ्या दिवशीही येथे मदतकार्य सुरुच आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी रात्री आणखी दोन मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 17 झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता
यावेळी या घटनास्थळाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट दिली. त्यांनी या बचाव कार्याची पाहणी केली. त्यांनी बचाव कार्याबद्दल बोलताना सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाले असून त्यानंतर आता या होर्डिंगचा मलबा घटनास्थळावरून हटवण्याचे कार्य सध्या सुरू आहे. अशी माहिती दिली.
मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून वाचण्यासाठी काही जण घाटकोपर येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका मोठ्या होर्डिंगखाली थांबले होते. त्याचवेळी होर्डिंग खाली कोसळले. या होर्डिंगखाली अनेक जण दबले गेले. वाहनांचेही मोठे नुकसान झाले.