Athletics Federation Cup मध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी; आता नीरजचा भाला ऑलम्पिकसाठी सज्ज

Athletics Federation Cup मध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी; आता नीरजचा भाला ऑलम्पिकसाठी सज्ज

Athletics Federation Cup Neeraj Chopra Won Gold : भारताचा गोल्डन बॉय अशी ओळख असलेल्या नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ॲथलेटिक्स फेडरेशन कप 2024 ( Athletics Federation Cup) या भालाफेक स्पर्धेमध्ये नीरजने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून ( Won Gold ) भारताचा झेंडा रोवला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

भुनेश्वरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने 82.27 मीटर लांब भाला फेकला. यामध्ये त्याने डीपी मनू या भालाफेक पटूला पराभूत केले. डीपी डीपी याचा थ्रो 82.6 मीटर होता. तसेच या कामगिरीनंतर नीरज चोप्रा ऑलम्पिकसाठी भारताचा झेंडा फडकवणे फडकवण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान या अगोदरच भारताचे ॲथलेटिक्स प्रमुख राधाकृष्णन नायर यांनी सांगितलं होतं की, आपल्या करिअरमध्ये अनेकदा 75 मीटरचा टप्पा पार केलेल्या खेळाडूंना ऑलम्पिकमध्ये जाण्यासाठी पात्रता फेरीची आवश्यकता नाही. त्यामुळे या स्पर्धेत देखील नीरज चोप्रा थेट अंतिम फेरीत खेळताना दिसला. मात्र डीपी मनू याला ऑलम्पिकमध्ये पात्र ठरण्यास अपयश आले आहे.

या स्पर्धेमध्ये खेळत असताना तिसऱ्या फेरीपर्यंत नीरज चोप्रा, दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र त्यानंतर त्याने थेट 82.27 मीटरचा भाला थ्रो केला. मात्र त्याच्या सोबत असलेल्या स्पर्धक मनूला हे अंतर पार करता आले नाही. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. तसेच स्पर्धेत उत्तम पाटील यांनी तिसऱ्या स्थानावर कांस्यपदक जिंकले. तर नीरज चोप्रासाठी गेल्या तीन वर्षातील ही पहिलीच देशांतर्गत स्पर्धा ठरली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज