Download App

Ajit Pawar नाव घेतलं तरी थरकाप होतो म्हणूनच ‘त्या’ पत्रावर सही केली, आता पोपटासारखा बोलतोय; आव्हाडांचा आरोप

Ajit Pawar यांना घाबरतो म्हणूनच भाजपसोबत जाण्याच्या मागणीच्या पत्रावर सही केली होती. असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad Criticize Ajit Pawar in Interview : अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राष्ट्रवादीमध्ये ( NCP ) बंड करून वेगळा गट निर्माण केल्यानंतर शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) हे वारंवार अजित पवारांवर निशाणा साधत असतात. त्यात आता पुन्हा एकदा एका वाहिनीला मुलाखत देताना आव्हाड यांनी आपण अजित पवार यांना घाबरत असल्याने मी शरद पवारांकडे पाठवण्यात येणाऱ्या आमदारांच्या भाजपसोबत जाण्याच्या मागणीच्या पत्रावर सही केली होती. असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.

लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य; जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार

त्या मुलाखतीमध्ये जितेंद्र आव्हाड यांना ते अजित पवारांना घाबरतात का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हो, मी अजित पवार यांना घाबरतो. त्यांचे नाव जरी घेतलं तरी मी थरथर कापतो. पण हे त्यांच्यासाठीच अपमानास्पद आहे. कारण शरद पवार हे त्यांच्यापेक्षा योग्य मोठी ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्याशी कधी एवढं बोलतही नाही. मात्र मला शरद पवारांची भीती कधीच वाटत नाही.

Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द

पण अजित पवारांची मला भीती वाटायची. त्यांच्या भीतीनेच मी शरद पवारांकडे आमदारांच्या भाजपसोबत जाण्याच्या मागणीच्या पत्रावर सही केली होती. मात्र मी जे पत्र भाजपला देण्यात आला त्यावर सही केली नव्हती. कारण सही करण्यासाठी अजित पवार यांना तोंडावर नाही. म्हणण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती.

तर आता त्यांनी पक्ष सोडून बाहेर गेल्यानंतर मी पोपटासारखा बोलत आहे. कारण ते डायरेक्ट विकेट काढायचे. त्यांच्या विरोधात जाणाऱ्या आमदारांना निधीच द्यायचे नाही. तोच आरोप आता अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. म्हणूनच ते बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. असंही आव्हाड म्हणाले.

follow us