संजय राऊत कुटुंबाने 2 करोड 15 लाखांची खिचडी खाल्ली, किरीट सोमय्यांचा आरोप

Kirit Somaiya on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांची मुलगी, भाऊ, मित्र तसेच पार्टनर अधिकारी यांच्या खात्यात खिचडीचे 2 करोड 15 लाखाचे कमिशन कीक बॅग सह्याद्री रिफ्रेशमेंट्स खिचडी कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर झाले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट्स या […]

Kirit Somaiya

Kirit Somaiya

Kirit Somaiya on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांची मुलगी, भाऊ, मित्र तसेच पार्टनर अधिकारी यांच्या खात्यात खिचडीचे 2 करोड 15 लाखाचे कमिशन कीक बॅग सह्याद्री रिफ्रेशमेंट्स खिचडी कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर झाले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट्स या कॉन्ट्रॅक्टरला खिचडीच्या निमित्ताने 6 करोड 37 लाखाचा पेमेंट केलं. त्यातील 2 करोड 15 लाखांची खिचडी संजय राऊत मित्रपरिवारने खाल्ली आहे.

जालन्यात आंदोलकांना ‘राज’ बळ; लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना वेशीवरच रोखा

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोविड काळातील घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये यासंर्भात पुरावेदेखील सादर केले होते. संजय राऊत यांनी आपले पार्टनर सुजीत पाटकर, राजीव साळुंखे आणि मित्रांच्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे कोट्यवधी पैसे वळते केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली

सुजीत पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. पाटकर हे मुंबईतील मोठे व्यावसायिक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंडमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.

Exit mobile version