LokSabha Election Result Arvind Sawant Win Yamini Jadhav defeat : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ( LokSabha Election Result ) सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पुढे असताना उद्धव ठाकरेंनी ( Udhhav Thackeray ) मुंबईतील 6 मतदार संघांपैकी तिसरा विजय खेचून आणला आहे. यामध्ये अनिल देसाई, अमोल कीर्तीकर त्यानंतर आता अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांनी ठाकरेंच्या गळ्यात मुंबईतील तिसऱ्या विजयाची माळ घातली आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव ( Yamini Jadhav ) यांचा पराभव केला आहे.
Uttar Pradesh Loksabha : अयोध्येत भाजपला राम ‘पावला’ नाही, समाजवादीची सायकल ‘सुसाट’…
पुर्वीच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईची जागा दोन वेळा सलग जिंकली होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार असलेले अरविंद सावंत हे शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आहेत. यावेळी देखील ते दक्षिण मुंबईतून मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये या मतदार संघात मुख्य लढत होती. त्यात ठाकरेंच्या अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा हा विजय मिळवला आहे.
शिवसेनेतील पक्ष फुटीसह या मतदारसंघात इतर घटक देखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे काँग्रेसकडून परंपरागत रित्या या मतदारसंघांमध्ये देवरा यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिली जात होती. मात्र सध्या मिलिंद देवरा यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपची वाट धरली. जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघात जवळपास 25% मुस्लिम मतदार आहेत. जे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तर महायुतीचे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या जागेसाठी गुजराती आणि मारवाडी तसेच इतर उत्तर भारतीय मतदारांवर अवलंबून होते. मात्र आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांसह हा गड राखण्यात यश आलं आहे.