Download App

निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis on Mumbai Municipal Election : विरोधकांकडून निवडणूक घेण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मात्र, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली. आम्हालाही निवडणूक हवी आहे, आम्ही निवडणुकीसाठी तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक एक काय फोडता हिंमत असेल तर निवडणुका घ्याच असे आव्हानच भाजपला दिले होते. त्यानंतर आज विधानपरिषदेत फडणवीस यांनी आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. त्यासाठी आम्ही सुद्धा तयारच आहोत असे सांगितले. त्यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान म्हणून पाहिले जात आहे.

अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट

 

ते पुढे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यामुळे यामध्ये राज्य सरकार काहीच करू शकत नाही. वॉर्डांची जी केस आहे ती वेगळी असून त्यात स्टे नाही. मुळात आरक्षणाची जी केस होती त्यात अनेक केस टॅग झाल्या. या केसचा निकाल लागेपर्यंत कोणतीच निवडणूक घेऊ नये असे सांगितले आहे.

यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्षेप घेतला. त्यावर फडणवीस म्हणाले, मी अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो की आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. आम्हीही तयारीत आहोत. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. आपण जरूर आयोगाकडे जाऊन माहिती घ्या. त्यांना विचारा. जर नसेल तर आपण सगळे एकत्रित जाऊ आणि त्यांना काय अडचण आहे ते विचारू, यावर सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले.

Aditya Thackery : राज्यात अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री, ज्यांनी उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले; आदित्या ठाकरेंचं टीकास्त्र

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

एकाएकाला काय फोडता. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, अस आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले होते. ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला फक्त गेल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करू, पक्षाच्या विरोधात काम करू नये. नाहीतर शिवसैनिक म्हणून आपल्याला त्यांना दाखवावे लागेल, असा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

Tags

follow us