Aditya Thackery : राज्यात अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री, ज्यांनी उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले; आदित्या ठाकरेंचं टीकास्त्र

Aditya Thackery : राज्यात अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री, ज्यांनी उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले; आदित्या ठाकरेंचं टीकास्त्र

Aditya Thackery : राज्यात येणारे उद्योग राज्याबाहेर गेल्याने सध्या राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात आता ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी टीका देखील या मुद्द्यावरून चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायाला मिळालं. खोके सरकारच्या नाकर्तेपणाची आणि उद्योगजगताचा सध्याच्या सरकारवर अजिबात विश्वास नसण्याची साक्ष देणारी ‘श्वेतपत्रिका’ आज प्रकाशित झाली! असं आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackery Criticize Shinde Fadnavis Pawar on Industries gone out of Maharashtra)

‘माझा जीव जाता जाता वाचला’, घातपाताच्या कटाबद्दल भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरेंनी एकल ट्वीट करत ही टीका केली. ते म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात जे उद्योग व प्रकल्प : एमआयडीसी इंडियासोबत महाराष्ट्रात येण्यासाठी अंतिम टप्प्यावरची चर्चा करत होते. तेच प्रकल्प बेकायदेशीर खोके सरकार येताच आणि त्यांच्या नेतृत्वाला भेटताच कसे महाराष्ट्रातून तळ हलवून बाहेर गेले. ह्याचा हा ढळढळीत पुरावा आहे! श्वेतपत्रिका बहुतेक तारखा आणि तथ्यं नमूद करताना, काही खणखणीत सत्य समोर आणते आहे.

मिंधे-भाजपचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष आणि खोके सरकार स्थापन झाल्यावर उद्योग कसे दुसऱ्या राज्यात पाठवले गेले. गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रताप केल्याने, सद्य परिस्थितीवर उद्योग जगताचा कसा अजिबात विश्वास उरलेला नाही. राज्यात दुर्दैवाने एक पूर्णपणे अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उद्योजकांच्या भेटींनंतर स्वहस्ते उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले. श्वेतपत्रिकेत वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन उद्योगांचा उल्लेख असताना, महाराष्ट्रापासून दूर ढकललेल्या इतर उद्योगांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश

1) वैद्यकीय उपकरण पार्क (Medical Device Park) 2) सौर ऊर्जा उपकरणे पार्क (Solar Energy Equipment Park) बल्क ड्रग पार्क बद्दलच्या उल्लेखावरून तर हे सिद्ध होते की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र हा सर्वतोपरी सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सर्वच्या सर्व 3 पार्क नाही, तरी किमान 1 पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते.

एकंदरीतच, हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता, की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा प्रश्न मला पडतोय! त्यांनी अधिकृतपणे मांडलेला रेकॉर्ड पाहता, दोघांनाही महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या मंत्रिमंडळात स्थानच मिळणार नाही. धोकेबाजीने सत्तेत आलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारमधले हे एक इंजिन तर पूर्णपणे फेल गेलेले आहे.

तसंच, खोके सरकार ने सांगितल्या प्रमाणे ‘वेदांता फॉक्सकॉन’ प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, त्या प्रकल्पाचा ह्या श्वेतपत्रिकेत उल्लेखही नाही.त्यात वेदांत फॉक्सकॉनच्या “फॉरवर्ड इंटिग्रेशन” प्रकल्पाचाही साधा उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते. तो प्रकल्प अजूनही सुरू आहे का? असा सवाल आदित्य यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube