‘माझा जीव जाता जाता वाचला’, घातपाताच्या कटाबद्दल भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
Sudhir Mungantiwar : गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर एनआयए (NIA) आणि एटीएस (ATS) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकून दहशतवाद्यांना अटक केली. ISIS शी संबंधित लोकांचा शोध घेतला जात आहे. एनआयए आणि एटीएसने अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, आरएसएस आणि भाजपच्या बड्या नेत्यांना टार्गेट केलं जाणार होतं, अशी माहिती तपासातून समोर आल्याची माहिती मिळत आहे. यावर भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) बोलतांन माझ्या गाडीलाही अपघात करण्याचा प्रयत्न झाला, असं खळबळजनक विधान केलं. (sudhir mungantiwar on terrorist they said about plot accident to kill him)
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे इतर काही नेते शत्रूंच्या निशाण्यावर आहेत. पण आम्हालाही धमक्या मिळतात. मात्र, धमक्या आल्यावर आम्ही मीडियासमोर येऊन सांगत नाही. धमकीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचावली पाहिजे, असाच आमचा प्रयत्न असतो. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली होती. यानंतर आरोपी तुरुंगातून धमकी देत असल्याचे समजले. भाजपच्या अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. पण या गोष्टी आम्ही मीडियापर्यंत कधी पोहोचवत नाही.
सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश
पुढ बोलतांना ते म्हणाले, माझ्याही गाडीचे नट-बोल्ट सैल होते. माझ्या कारला अपघात होता होता वाचला होता. माझा जीव जाता जाता वाचला. मात्र याबाबत मी कोणत्याही पत्रकार परिषदेत बोललो नाही. याबाबत मी विधानसभेत काहीही बोललो नाही. मी फक्त पोलीस खात्याशी बोललो. एटीएसने अनेक मंत्र्यांना आपल्या लोकांना सतर्क करण्यास सांगितले आहे. कारण काही परदेशी शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे मित्र, नातेवाईक किंवा ऑफिस स्टाफ वापरतात. त्यांना काही क्लिप त्यांना पाठवल्या जातात, क्लिप डाऊनलोड करायला सांगितल्या जातात, त्यानंतर संबंधित मोबाईल तुमच्या आसपास असला तरी तुमची प्रत्येक गोष्ट पाकिस्तानपर्यंत पोहोचते. त्यामुळं अनेक लोकांना सावध केलं आहे, अशी खळबळजनक माहिती मुनगंटीवार यांनी दिली.