Download App

‘राज्यात 48 खासदार अन् काँग्रेसला भोपळा’; बावनकुळेंनी सांगितलं विजयाचं भन्नाट गणित

Chandrashekhar Bawankule : मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) फक्त 1 जागा मिळाली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल तेव्हा काँग्रेस राज्यात शून्यावर आणण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. पंतप्रधान मोदी ज्यावेळी शपथ घेतील त्यावेळी राज्यातून 48 खासदार हात वर करून उभे असतील. तसेच राज्यात मुख्यमंत्री शपथ घेतील त्यावेळी महायुतीचे 225 आमदार उभे असतील,  असा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मोठी बातमी : ‘इंडिया’च्या समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह तेरा जणांचा समावेश

बावनकुळे म्हणाले, आधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री असताना जो जनादेश मिळाला होता. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून विश्वासघात केला. पण, एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या सरकारला लाथ मारून बाहेर पडले. युतीचं सरकार आणण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. 2014 ते 2019 राज्याच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट म्हणून फडणवीस यांनी काम केलं. तसेच आता पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी अजितदादा आले त्यांचंही स्वागत.

मागच्या  निवडणुकीवेळी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. आताच्या निवडणुकीची मतमोजणी होईल तेव्हा काँग्रेस राज्यात शून्य करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेऊ. आता सध्या देशातील 36 पक्षांचे नेते मुंबईत आलेत. पण आपण जर अभ्यास केला तर त्यातील 32 पक्षांचे एक टक्काही वोट शेअर महाराष्ट्रात नाही. मुंबईत येण्याआधी यांनी मोठ्या बाता मारल्या होत्या. पण, मोदीजींनी या सगळ्यांची हवाच काढून टाकली आहे. आता या पक्षांना धडा शिकवण्यासाठी काम करायचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.

One Nation One Election ला अजितदादांची साथ; विरोधकांनाही दिला इशारा

आता लोकांच्या घरी जाऊन भेटायचं

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा चाळीस हजार कुटुंबांना लाभ मिळाला आहे.  तर आता या कुटुंबांना भेटलं पाहिजे. उद्यापासून आपण ते काम करू. आपल्याकडे सरकारच्या कामांची मोठी शिदोरी आहे. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवले तर 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते राज्यात मिळतील. घर चलो अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून नव्या विकासाचं पर्व सुरू झाले. सरकारच्या कामांची शिदोरी घेऊन लोकांसमोर जाऊ, असे बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us