Sanjay Raut Press Conference : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) खळबळजनक आरोप केला आहे. नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली तब्बल ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. आता हाच घोटाळ्याचा पैसा निवडणुकीसाठी वापरला जात असल्याचा दावा त्यांनी केला. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घोटाळ्याचा उल्लेख करत भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
Sanjay Nirupam On Sanjay Raut : संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!
नाशिक महानगरपालिका हद्दीत नगरविकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले आठशे कोटींचे गैरव्यवहार, नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाला गेले? यासंदर्भात माझं काम चालू आहे. रीतसर तक्रार मी करत आहे. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहे. हा जो पैसा राजकारणामध्ये येत आहे सध्या महाराष्ट्रात तो कोणत्या माध्यमातून येत आहे त्याचा खुलासा आम्ही करणार आहोत.
नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनात 800 कोटी रुपये गैरमार्गाने गोळा केले. हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा मग शिवसेना, फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोहोचत आहे? हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्यासहित देणार आहे. साधारण 17 ते 18 महत्त्वाचे बिल्डर आहेत. जे शिवसेना आणि फडणवीस गटाशी संबंधित आहेत. त्यांना हा लाभ मिळावा म्हणून भूसंपादनाचा रेटा लावला, शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.
भूसंपादनाचे बिल्डरांना पैसे मिळाले. हे सगळे बिल्डर मिंधे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत. समृद्धीमध्ये देखील तेच झालेलं आहे आणि काही ठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत हेच होत आहे. मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाच एक प्रकरण देणार आहे. त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललं आहे? ते तुम्हाला कळेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
संजय राऊत सुट्टी देईनात! CM शिंदेंच्या उपस्थितीत गुंडांचा शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो ट्वीट
मुंबईमध्ये एका गुजराती कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करू नये, मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री या विषयावर गप्प आहे. हिंमत असेल तर आवाज द्या, नाहीतर आम्ही बघतो काय करायचं आहे ते असा इशारा संजय राऊत यांनी सरकारला दिला.