Download App

शासन आपल्या दारी… पण इथे ऑनलाइन दाखल्यासाठी हेलपाटे !

  • Written By: Last Updated:

मुंबई (विशेष प्रतिनिधी): दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता लागते. त्यात
राज्यात शाळा सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्याना दाखले मिळाले नाहीत. त्यासाठी विद्यार्थी व पालक हे आॅनलाइन दाखल्यासाठी सेतू कार्यालयात (online certificate) हेलपाटे मारत नाहीत. त्यात विविध विभागांच्या नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यासाठी तरुण अर्ज करण्यासाठी विविध प्रकारचे दाखले काढावे लागत आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सध्या राज्यभर सुरू आहेत. अनेकदा हेलपाटे मारुनही दाखला मिळत नाही. हे शासनाने एक पत्रक काढून मान्य केले. (mahrashtra-goverment people wait for online certificate)

राज्य सरकारने काढलेल्या पत्रकानुसार गेल्या काही दिवसात शासकीय सेवा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याही चार ते पाचपटीने वाढली आहे. ही संख्या पाहता सर्व्हरवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे दिवसभरात ५० ते ६० हजार दाखले दिले जात आहेत. यामुळे अनेकांना नोकरभरतीसाठी अथवा शिक्षणासाठी दाखले देता येत नाहीत. हे पाहता दाखल्यासाठी अर्ज स्वीकारक्ण्याची वेळ १५ दिवसांनी वाढवून द्यावे, असे आदेश माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव यांनी सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

बीआरएसने दिलेल्या ऑफरवर विचार करणार नाही असं नाही; पंकजा मुडेंचं सूचक वक्तव्य

अनेक जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही योजना सुरू आहे. या योजनेत लाभार्थ्यांना दाखल्यांसह अनेक लाभाच्या योजनेचे वाटप होते. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा सरकार करत आहे. पण आज निघालेल्या आदेशानुसार राज्यात अनेक भागात अजून अतिजलद अशा ऑनलाइन पद्धतीने दाखले पोहचत नाहीत. हे वास्तव मात्र समोर आले आहे.

मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन आता मोर्चा काढताहेत; CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पूर्वी दाखले काढण्यसाठी सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागत होते. आता सर्व दाखले ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यासाठी सेतू केंद्राचे संख्याही ग्रामीण भागात व शहरात वाढविण्यात आलेले आहेत. त्यानंतर नागरिकांना वेळेवर दाखले मिळत नाही.

Tags

follow us