Download App

पिताश्री मुख्यमंत्री असताना काय करत होतात? एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना कायंदेंचा सवाल

Manisha Kayande यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन महायुती सरकारला निशाणा साधणऱ्या आदित्य ठाकरेंना सवाल करत प्रत्युत्तर दिले आहे.

Manisha Kayande Question to Adiya Thackeray for Creticize on salaries of ST employees : आदित्य ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन महायुती सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना सवाल करत प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

आदित्य ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन महायुती सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मी आदित्य ठाकरे यांना आठवण करुन देऊ इच्छिते की, तुमच्या सरकारमध्ये म्हणजे तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना तब्बल 172 दिवसांचा एसटीचा संप झाला होता. 90 हजार कर्मचारी त्या संपामध्ये सहभागी झाले होते आणि तेव्हा तुम्ही काय करत होतात?

ठाकरेंना धक्का, माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

तुम्ही एकदा तरी त्या आझाद मैदानावर गेलात का? त्यांना भेटलात का? त्यांचा संप मिटवण्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वडिलांनी माननीय उद्धव ठाकरेजी यांनी काय प्रयत्न केले? तर कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर जवळजवळ दोन हजार कर्मचारी बडतर्फ झाले. त्याच्या घरातली चूल विझली, तरी तुम्ही काय केलं नाही. त्यानंतर अकरा हजार कर्मचारी निलंबित झाले परंतु त्यांनी तुम्हाला कोणताच फरक पडला नाही आणि हे सगळं असताना म्हणजे आपण स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही.

लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांचे प्रशासकीय आकलन कच्चे; शरद पवार गटाला अदिती तटकरेंचं प्रत्युत्तर

आझाद मैदानला जाणं तर सोडाच हे सगळं तुमच्या काळात घडलं. आम्ही एसटीच्या नवीन बसेस घेतोय कर्मचाऱ्यांच्या पगारात वेळेवर होतील, याची आम्ही काळजी घेतोय. त्यांना एसटी डेपोमध्ये सोयी सुविधा चांगल्या दिल्या जातील, यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. निदान तुमच्या काळात काय झालं होतं ते जरा आठवून बघा आणि नंतर आमच्यावर टीका करण्याचे धाडस करा. असा सवाल कायंदे यांनी केला आहे.

follow us