Manoj Jarange Patil Decision Stop Drinking Water : आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, असं सांगितले जात आहे, पण ते प्रत्यक्षात मिळालेच नाही. आज लाखो गरीब मराठा मुंबईत आले आहेत. सर्व समाजातील गोरगरीब लोक या आंदोलनात सेवा करत आहेत. जर राज्यातील गरीब मराठे मुंबईकडे येत असतील, तर त्यांनी आपली गाडी थेट ग्राउंडवर आणू नये. रेल्वेने आझाद मैदानावर पोहचावे. गाड्या सुरक्षित राहतील, असंही मनोज जरांगे म्हटले आहेत.
मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही! जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं…
मराठ्यांचे लोकं मुंबईत
गरिब मराठ्यांचे लोकं मुंबईत आलेत. सर्व जातीधर्माचे लोकं आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करणार आहेत. ही आंदोलन म्हणजे आमची वेदना आहे. गोरगरिबांच्या लेकरांच्या जीवनाचा प्रश्न आहे. याला गर्दी समजू नका. माझी राज्यातील गरिब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही राज्यभरातून मुंबईकडे येत आहेत. तुम्ही गाड्या पार्किंगमध्ये लावा, रेल्वेने आझाद मैदानावर यावा. आझाद मैदानाचे आजुबाजूचे 29 ग्राऊंड फुल झाले आहेत. पोलीस बांधव रक्षण करत आहेत, असं देखील मनोज यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातून जेवणाचे ट्रक येत आहेत, सुरूवातीला लोक कुठं थांबले आहेत, ते बघत तसं जेवण वाटप करत आझाद मैदानाकडे या, असं आवाहन जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबईत आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी BMC सज्ज! पाणी-शौचालयाची व्यवस्था, स्वच्छतेसाठी 8 हजार कर्मचारी
उद्यापासून पाणी पिणं बंद
त्यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केले की, तुम्ही जेवण घेऊन मुंबईकडे येत असाल तर ते जेवण तुम्ही पार्किंग ठिकाणीच वाटप करा, अन्यथा काही लोक उपाशी राहतील. अन्नछत्र सुरू करणाऱ्यांनी यासाठी पैसे मागू नयेत. गरीबांचे रक्तपिपासू होऊ नका. जर कोणी पैसे मागत असेल, तर मी थेट माध्यमांमधून त्यांची नावे जाहीर करीन.
सरकारवर दबाव वाढणार
यावेळी जरांगे यांनी एका नेत्यावर थेट हल्ला चढवला. तू लोकसभेच्या निवडणुकीतही लोकांकडून पैसे घेतलेस. डिझेल खर्चाचे हिशेब सांगतो, मी तुला पैसे देतो. तू रेनकोट वाटलेस, त्यासाठी कोणाकडून पैसा घेतलास, हे सगळं लोकांना माहित आहे. दादा असशील का पादा असशील, मराठ्यांनी आता कोणालाही पैसा द्यायचा नाही, असे ठणकावून ते म्हणाले. आता त्यांच्या ‘उद्यापासून पाणी पिणं बंद’ या घोषणेमुळे आंदोलनात मोठी कलाटणी येणार असून राज्य सरकारवर निर्णयाचा तातडीने दबाव वाढणार आहे.