Download App

Manoj Jarange वैद्यकीय उपचार घ्या, सरकारलाही त्यांच्या तब्यतेची चिंता; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नहाी. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती थोडीशी खालावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंबद्दल शिंदे काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः ची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या तब्येतीची आम्हाला चिंता आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. कारण शेवटी सरकारलाही त्यांच्या तब्यतेची चिंता आहे. पाणी घेतलं पाहिजे. त्यांनी मराठा समाजासाठी उभारलेला लढा सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे. त्यासाठी आम्ही एक महत्त्वाची बैठक घेतली आहे.

Maratha Reservation : वेळ पडली तर हिवाळी अधिवेशन उधळून लावू; निलेश लंकेंचा इशारा

त्यामध्ये सुदैवाने दोन मार्गाने मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जुन्या कुणबी नोंदी आणि क्युरेटिव्ह पिटीशन यावर युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, राज्यात शांतता देखील राखण्यात यावी. आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं जाऊ नये. असं आवाहन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांना केलं आहे.

Sanjay Raut : स्वतःसाठी दिल्ली दौरे सुरु मात्र आरक्षणासाठी…; राऊतांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं

आज मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांची माहिती देत आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती थोडीशी खालावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Tags

follow us