Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. काल बीड येथील सभेत त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर आत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी याबाबत भाष्य केले आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेनंतर गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे आता एक खिडकी उघडी झाली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात मराठा समााजाला आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावून कायदा करण्यात येईल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत उपोषण करण्याची गरज राहणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा