Migrant Brutally Assaulted Young Woman At Hospital : कल्याणच्या (Kalyan) नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने रुग्णालयात कार्यरत असलेल्या रिसेप्शनिस्ट तरुणीला भरदिवसा निर्घृणपणे मारहाण (Brutally Assaulted Young Woman) केली. ही घटना 21 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली असून, रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार (Crime News) कैद झाला आहे.
नशेत होता आरोपी तरुण
‘श्री बाल चिकित्सालय’ या खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या पीडित तरुणीने संबंधित तरुणाला डॉक्टर सध्या मिटींगमध्ये आहेत. थोडा वेळ थांबा, असे शांतपणे सांगितले. मात्र हे ऐकून त्याचा संताप (Mumbai News) अनावर झाला. रागाच्या भरात त्याने अचानकपणे तिला लाथ मारून खाली फेकले. तिच्यावर पुन्हा लाथाबुक्क्यांचा पाऊस पाडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मारहाण करणारा तरुण नशेत असल्याचे दिसून आले. तो जबरदस्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. नियमाचे पालन करत रिसेप्शनिस्टने त्याला थांबवले असता, तो संतापून तिच्या अंगावर धावून गेला आणि अत्यंत अमानुष पद्धतीने तिच्यावर हात उचलला.
पतीकडून 12 कोटींसह गडगंज संपत्तीची पोटगी मागणाऱ्या महिलेला कोर्टाने फटकारलं, ‘ते’ घ्या अन्यथा…
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव गौरव झा असे असून, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत आणि घटनेच्या मागील पार्श्वभूमीची चौकशीही सुरू आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील कर्मचारी, विशेषतः महिलांचे सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. डॉक्टरांप्रमाणेच रिसेप्शन, नर्स, सहाय्यक कर्मचारी यांच्याही सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Pak vs Ban : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बांगलादेशने मालिका जिंकली
कठोर कारवाईची मागणी
राज्यात रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी विशेष कायदे अस्तित्वात आहेत. मात्र प्रत्यक्षात अशा घटना थांबत नाहीत. या घटनेने दाखवून दिले की, कायदे असूनही अंमलबजावणीत हलगर्जीपणा होत असल्याने आरोपींना धास्ती राहिलेली नाही. फक्त रुग्णालयातच नव्हे तर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही या घटनेमुळे निर्माण झाला आहे. एका महिला कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडताना भोगलेली ही हिंसा केवळ धक्कादायकच नाही, तर सामाजिकदृष्ट्याही लाजीरवाणी आहे.
संपूर्ण घटनेनंतर स्थानिक नागरिक, महिला संघटना तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. फक्त तात्पुरते आरोप न करता त्याला कठोर शिक्षेची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.