Download App

Mira Road Murder : 9 वर्षांपूर्वी अनाथ सरस्वतीला जाळ्यात ओढलं अन् डोईजड झाल्यावर संपवलं…

Mira Road Murder : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्यांकांडाची पुनरावृत्तीच आता मुंबईत घडली आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेतील मृत प्रेयसी सरस्वती वैद्य असं नाव असून मागील अनेक वर्षांपासून प्रियकर मनोज साने आणि प्रेयसी सरस्वती मीरा रोड भागात राहत होते. घटनेतील मृत प्रेयसी सरस्वती वैद्य ही अनाथ असल्याची माहिती समोर आलीय.

अनाथ सरस्वती वैद्य तिच्या लिव्ह इन पार्टनरला मनोज सानेला 2014 साली एका रेशन दुकानात भेटली होती. याच दुकानात मनोज नोकरी करत होता. त्यावेळी सरस्वती मनोजला पहिल्यांदा भेटली होती. त्यानंतर दोघे मीरा रोड परिसरातील मनोजच्या घरी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.(MIra Road Murder Case)

PHOTO : कसोटीत ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी आणि स्मिथचे शानदार शतक, असा काढला गोलंदाजांचा घाम

एका किराणा दुकानात भेटलेली सरस्वती वैद्य आणि मनोजमध्ये चांगली मैत्री झाली. काही दिवसांत या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं होतं. दोघांचही एकमेकांवर प्रेम जडल्याने अनाथ सरस्वतीने मनोजच्याच घरी लिव इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबईतील मीरा रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये 56 वर्षीय मनोज आणि सरस्वती हे जोडपं राहत होतं. मागील अनेक वर्षांपासून दोघे सोबत होते. पण अचानक दोघांमध्ये वादाला तोंड फुटलं होतं. मनोजला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद-विवाद होत होते. पण तरीही दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याने वाद मिटवून हे जोडपं आपलं आयुष्य आनंदान जगत होतं.

Kon Honaar Crorepati: परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार विशेष भाग

अखेर आज मनोजच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा सुगावा पोलिसांना लागल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले असता समोर दिसलेली परिस्थिती पाहुन पोलिसही हादरुन गेले. पोलिसांनी जेव्हा मनोजच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरात मोठी दुर्गंधी आली. हॉलमध्ये त्यांना झाड कापण्यासाठी कटर दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी बेडरुममध्ये जावून पाहिले. जेव्हा बेडवर काळ्या रंगाच्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच पिशव्या दिसल्या.

Horoscope Today : कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे सिंह राशीचा आजचा दिवस

किचनचा दरवाजा उघडून पाहिल्यावर त्या ठिकाणी तीन बादल्या दिसल्या. त्यात मृतदेहाचे तुकडे होते. चहुबाजूनं रक्तच रक्त दिसत होतं, बेडवर केसचं केस विखूरलेले होते. दुर्गंधी जावी म्हणून घरात मोठ्या प्रमाणात एअर फ्रेशनर होते, हे सर्व पाहून पोलिसही हादरुन गेले. त्यानंतर मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

त्यानंतर पोलिसांनी आरोप मनोजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मनोजने आपल्यावरील हत्येचा आरोपांचं खंडन केलंय. मनोज म्हणाला, मला तिच्या चारित्र्यावर संशय होता, यावरुन दोघांमध्ये वाद होत असत. त्यानंतर तिने विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा खुलासा मनोजने केला आहे.

Ajit Pawar : औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? राज्यातील घटनांवर अजित पवार संतापले

दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपी मनोज सानेचं लग्न झालेलं नव्हतं. मनोजचं आणखी एक घर बोरीवली परिसरात आहे. बोरिवलीमध्ये मनोजच्या कुटुंबातील इतर सदस्य असतात. मात्र, मनोज आपल्या कुटुंबियांपासून वेगळं मीरा रोड भागात राहत होता.

या प्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या हत्याकांडाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. आरोपी मनोज सानेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Tags

follow us