Download App

अग्रवालच्या महाबळेश्वरमधील बेकायदेशीर रिसोर्टवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

महाबळेश्वरमध्ये अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा, असे आदेश सीएम शिंदेंनी दिले आहे.

Eknath Shinde On Agarwal Resort : पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील (Pune Accident) अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील कनेक्शन उघड झालं आहे. त्यांनी ‘एमपीजी क्लब’ हे पंचतारांकित हॉटेल सरकारी जागेत उभारल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी उघडकीस आणलं. आता या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलं.

अखेर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडणं आलं अंगलट 

महाबळेश्वरमध्ये अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा, असे आदेश सीएम शिंदेंनी दिले आहे.

सीएम एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या दरे गावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. त्यांना अग्रवाल यांच्या बेकादेशीर पंचतारांकित हॉटेलविषयी विचारले असता ते म्हणाले की, बेकायदेशीरपणे कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. ज्यांनी बेकयादेशीर प्रकार केले असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. अग्रवाल कुटुंबाने जर सरकारी जमीनीवर अतिक्रमण करून किंवा बेकायदेशीर ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ब्लड सॅम्पल हेराफेरीप्रकरणी मोठी कारवाई! ससूनचे डीन बदलले, तावरेसह तिघे निलंबित 

पुणे अपघात आणि त्यातील आरोपींविषयी दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधककांकडून होत आहे. अशातच विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल सरकारी जागेवर असल्याचं समोर आलं आहे. अग्रवाल यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून सरकारी भाडेपट्ट्याच्या जागेत महाबळेश्वरमध्ये एक पंचतारांकीत हॉटेल थाटलं. धक्कादायक बाब म्हणजे यात अनधिकृत बारही चालवला जात असल्याचं बोलल्या जातं.

दरम्यान, आता मुख्यमंत्री शिंदेंनी या पंचतारांकित हॉटेलवर बुलडोझर चालण्याचे आदेश दिले असल्यां प्रशानस काय पाऊल उचलते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us