Download App

Mumbai Congress : ‘आम्ही काँग्रेसमध्येच, कुठेही जाणार नाही’; ‘राष्ट्रवादी’ प्रवेशाच्या चर्चांना सिद्दीकींचा फुलस्टॉप!

Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला खिंडार पडण्याची (Mumbai Congress) स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत काँग्रेसला धक्काचं बसल्याचं दिसून येत आहे. आज दिवसभर याच राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे.  त्यातच आता आमदार झिशान सिद्दीकी यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर पक्षप्रवेशाच्या चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या आहेत.

मोठी बातमी! मुंबईत काँग्रेसला खिंडार; सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार

या चर्चा कशा सुरू झाल्या हे मला सुद्धा माहिती नाही. आम्हाला थेट दिल्लीतूनही फोन येत आहेत. मात्र आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे अशा स्पष्ट शब्दांत आमदार सिद्दीकी यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सिद्दीकी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कालपासून अशी चर्चा आहे की तुम्ही आणि तुमचे वडील दोघांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि तुम्ही 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहात याबाबत काय सांगाल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सिद्दीकी म्हणाले, नाही असे काही नाही. आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे. भेट घेतल्याचा मुद्दा आहे तर आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे भेटीगाठी तर होतच असतात.

संजय राऊत म्हणाले होते की बाबा सिद्दीकी जर अजित पवार गटात जात असतील ही सरळसरळ मुस्लीम मतांत विभाजनाची खेळी आहे. यामुळे भाजपलाच फायदा होणार आहे असे विचारल्यावर सिद्दीकी म्हणाले, ही जागा (वांद्र पूर्व) शिवसेना जिंकेल असे राऊत म्हणाल्याचे आमच्या ऐकण्यात तर आले होते. संजय राऊत यांच्यासारखे वरिष्ठ नेते जर काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघाबाबत असे बोलत असतील तर ही महाविकास आघाडीसाठी दुर्दैवाची बाब आहे. मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्याबाबतीतही राऊतांनी आधी अशीच वक्तव्ये दिली होती. अशी वक्तव्ये निश्चितच पक्षात फूट पाडणारी आहेत. राऊत वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांच्याबाबतीत जास्त काही बोलणार नाही.

सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल

follow us