मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

Mumbai Former Mayor Vishwanath Mahadeshwar passes away : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. […]

Untitled Design   2023 05 09T075918.128

Untitled Design 2023 05 09T075918.128

Mumbai Former Mayor Vishwanath Mahadeshwar passes away : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील कणकवली गावाहून मुबंईत आले होते.

महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे.

महाडेश्वरांची राजकीय कारकीर्द
विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2017 ते 2019 दरम्यान मुंबईचं महापौरपद भूषवलं होते. तसेच महाडेश्वर यांनी 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2007 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. तर 2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती.

मणिपूर हिंसाचार ! 60 लोकांचा मृत्यू तर 1700 घरं जळून खाक…

दरम्यान महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या मारहान प्रकरणी महाडेश्वर यांना अटक करण्यात आली होती. तसेच अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती

Exit mobile version