Download App

Mumbai : तुम्हीही बसमध्ये गाणी ऐकता, मोठ्याने बोलता? तर कारवाईसाठी तयार राहा…

  • Written By: Last Updated:

Mumbai : प्रवासात गाणी एकणे, फोनवर बोलणे हे छंद आपल्यापैकी अनेकांना असतात. मात्र आता असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण आता नवी मुंबई (Mumbai) महानगर पालिका परिवहन विभागाकडून यावर निर्बंध आणणारं एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार तुम्ही आता मुंबईमध्ये सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असाल तर प्रवासात गाणी एकणे, फोनवर मोठ्याने बोलणे हे प्रकार केल्यास तुमच्यावर कारवाई होणार आहे.

Gopichand Padalkar : रोहित पवार बिनडोक, तर पडळकरांनी संघर्ष यात्रेचा सल्ला देणाऱ्याचीही अक्कल काढली

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभागाचे परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, नवी मुंबईमध्ये प्रवास करताना मोठ्या आवाजात गाणी एकणे, फोनवर मोठ्याने बोलणे व्हिडीओ लावणे. हे प्रकार केल्यास तुमच्यावर कारवाई होणार आहे. कारण यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर जादू; ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी

त्यामुळे इतर प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेकदा प्रवाशांमध्यये बसमध्ये वाद विवाद देखील होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे पालन केल्यास संबंधित व्यक्तीवर मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. असं देखील या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Rohit Pawar : अजितदादांचं वक्तव्य चुकीचंच; रोहित पवारांनीही रोखठोक सुनावलं

तसेच यामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की, परिवहन मंडळाच्या सर्व चालक, वाहक आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी देखील या नियमांच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही अशा प्रकारे प्रवासात गाणी एकणे, फोनवर मोठ्याने बोलणे हे करताना आढळले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे हे प्रकार टाळा आणि आपल्या सहप्रवाशांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

Tags

follow us