Download App

मुंबईमधील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं यजमानपद कोणाकडं? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Nana Patole On INDIA Meeting : भाजपविरोधात देशामध्ये उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये होणारी ‘इंडिया’ची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवस चालणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंडियाच्या बैठकीचे यजमानपद महाविकास आघाडीकडं राहणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.(Mumbai Nana patole saiys Who will host India’s meeting? mahavikas aghadi congress shivsena ncp sharad pawar uddhav thackeray)

mumbai-nana-patole-saiys-who-will-host-indias-meeting-mahavikas-aghadi-congress-shivsena-ncp-sharad-pawar-uddhav-thackeray

नाना पटोले म्हणाले की, इंडियाची ही तिसरी बैठक आहे. या बैठकीमध्ये अनेक ठराव होणार आहेत. त्यातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर लावलेले खोटे आरोप करुन हाय कोर्टाने सुनालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. अर्थात सत्याचा विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या या होणाऱ्या बैठकीचं वेगळं महत्व राहणार आहे.

INDIA VS NDA : मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीची तारीख आणि हॉटेल ठरले

मुंबईमध्ये होणारी ‘इंडिया’ आघाडीची बैठक चांगली पार पडावी त्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो होतो. त्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले, तर पुढे महाविकास आघाडीवर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला.

त्यावर नाना पटोले म्हणाले की, आमच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आहेत, ही दोन व्यक्तीच आमच्यासाठी महत्वाची आहेत, आणि आज आम्ही तिघेही एकत्र होतो, असेही यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

इंडियाच्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षातील पाच जणांची समिती स्थापन करणार असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. ही समिती इंडिया बैठकीचे आयोजनासाठी काम करणार असल्याचे नाना म्हणाले.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष शरद पवार आमच्यासोबत असेपर्यंत महाविकास आघाडीला कोणी हात लावणार नाही, असेही यावेळी नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

Tags

follow us