Mumbai Accident : राज्यात हिट अँड रनच्या घटना काही केल्या थांबण्यास तयार (Mumbai Accident) नाहीत. भरधाव वेगातील कारने लोकांना चिरडल्याच्या घटना रोजच ऐकायला येत आहेत. आताही अशीच भीषण घटना राजधानी मुंबईत घडली आहे. एका आलिशान कारने एका निष्पाप (Road Accident) व्यक्तीचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कारचालकाने आधी या महिलेला जोराची धडक दिली नंतर दुभाजकापर्यंत फरपटत नेलं. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू
नागरिकांनी कारचालकाला पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत कारचालक जखमी झाला आहे. संतापलेल्या लोकांनी कारचीही तोडफोड केली आहे. येथील एक महिला मेहंदी क्लास संपवून (Malad Accident) घरी निघाली होती. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या कारने जोराची धडक दिली. यानंतरही कारचालकाने कार थांबवली नाही तर या महिलेला रस्ता दुभाजकापर्यंत फरपटत नेलं. अपघात घडताच येथील नागरिकांनी धाव घेतली. येथील प्रत्यक्षदर्शींनी आणि कारचालकाने महिलेला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच या महिले़चा मृत्यू झाला होता.
यानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी या कारचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कारचालकही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी सुरुवातीलाच कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. कार चालवताना तो शुद्धीत होता की त्याने मद्यपान केलं होतं याची माहिती अजून समोर आलेली नाही. याची खात्री करण्यासाठी मालाड पोलिसांनी कारचालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
भीषण अपघात! पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये बस दरीत कोसळी; २६ जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.