Mumbai : मुंबई (Mumbai) शहरावर सध्या प्रदूषणाचं संकट घोंगावत असताना त्यात आता मुंबईकरांवर लठ्ठपणाचं (Obesity) संकट देखील ओढावलं आहे. त्याबद्दलचा एक अहवाल मुंबई महानगर पालिकेने जाहिर केला आहे. त्यानुसार मुंबईमध्ये 46 टक्के लोकांचं वजन सरासरीपेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं आहे.
Naal Bhaag 2: …अन् भार्गव जगतापची ‘नाळ भाग 2’शी नाळ जोडली गेली
2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे एक स्टेप्स नावाचं सर्व्हेक्षण केलं आहे. यामध्ये मुंबईमध्ये 46 टक्के लोकांचं वजन सरासरीपेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं आहे. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्गीकरणानुसार बीएसआय 25 किलोंपेक्षा अधिक आहे. तर 12 टक्के मुंबईकर लठ्ठपणाच्या श्रेणीमध्ये आहेत. यातही महिलांचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे.
Ajit Pawar : दिवाळी संपताच अजितदादांची खलबत; निधी वाटपावरून आमदारांची नाराजी दूर होणार?
त्याचबरोबर त्यामध्ये 18 ते 69 वर्ष या वयोगटातील सुमारे 18 टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण 126 मिलिग्रॅम पेक्षा आधिक आहे. तर प्री-डायबेटिसची टक्केवारी 15.6 टक्के आहे. लठ्ठ आणि बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
त्यामुळे महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल आण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुंबईकरांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक चाचण्या करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखान तसेच हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल, तर ‘हे’ करा…
पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा आरोग्यदायी असतो आणि जेव्हा तो व्हिनेगरमध्ये मिसळला जातो तेव्हा त्यात आधीपासून असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक वाढतात. व्हिनेगरसह कांदा खाल्ल्याने पचनास मदत होते कारण त्यात प्रोबायोटिक्स आणि बरेच आतडे अनुकूल एन्झाइम असतात.
कांद्यामध्ये एलिल प्रोपिल डायसल्फाइड असते. हे तेल इंसुलिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. व्हाईट व्हिनेगरमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचा गुणधर्म देखील असतो, त्यामुळे ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत वर-खाली होत राहते त्यांच्यासाठीही या दोघांचे मिश्रण खूप फायदेशीर आहे.