Download App

नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू

नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक पार पडली.

  • Written By: Last Updated:

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे (Local government elections) सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) महानगरपालिका निवडणुकीसाठी (Municipal elections) चांगलीच कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलि (Nawab Malik) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या प्रदेश कार्यालयात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक पार पडली.

ब्रेकिंग! सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित, पूरामुळे निवडणुकीची रणधुमाळी थांबली 

मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय, सहकार, असंघटित कामगार, हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, झोपडपट्टी या सर्व सेलच्या प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.

मोठी बातमी! एअरटेलचा गरीबांना झटका, 249 रुपयांचा रिचार्ज बंद 

या बैठकीला मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक – शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींसह महिला सेलच्या मुंबई अध्यक्षा आरती साळवी, मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष विभू घुगे, ओबीसी अध्यक्ष बबन मदने, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष बापू धुमाळे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष हुजफ्फा इलेक्ट्रिकवाला, झोपडपट्टी सुधार सेलचे घनश्याम भापकर आदी उपस्थित होते.

follow us