धक्कादायक! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राने वार करत संपवलं

मुंबईतील भायखळातील म्हाडा कॉलनीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Mumbai Crime

Mumbai Crime

Mumbai News : राज्यात गुन्हेगारी घटनांत मोठी वाढ झाली आहे. धारदार शस्त्राने (Mumbai News) हत्या करण्याची तर मालिकाच लागली आहे. आताही एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या (Ajit Pawar NCP) तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही थरारक घटना काल शुक्रवारी घडली होती. या घटनेत तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! ‘शर्मा नव्हे सिद्दीकी’, कित्येक वर्षांपासून भारतात वास्तव्य; पाकिस्तानी कुटुंबाचा भांडाफोड

याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सचिन कुर्मी म्हाडा कॉलनी परिसरात थांबले होते. याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन कुर्मी अत्यंत गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी मात्र त्यांना मृत घोषित केले.

सचिन कुर्मी यांच्यावर हल्ला कुणी केला, हल्ल्यामागे नेमकं काय कारण होतं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून या तपासात ही माहिती समोर येईलच. परंतु, या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. मयत सचिन कुर्मी हे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे (Chhagan Bhujabl) पुत्र समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आज कुर्मी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार! रस्त्यांना नदीचं रुप, दोन विमाने हैदराबादकडे वळवली, BMC कडून हायअलर्ट जारी 

सचिन कुर्मी यांच्या हत्येनंतर आता राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तत्काळ बेड्या ठोकण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजून कुणालाही अटक केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आज कुर्मी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच समीर भुजबळ तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

Exit mobile version