Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंवर एक गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सदावर्तेची गाडी फोडणारे आरोपी काल मातोश्रीवर होते. हा नियोजित हल्ला होता. राणे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले नितेश राणे?
सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी राणे म्हणाले की, सदावर्तेंची गाडी फोडणारे आरोपी काल मातोश्रीवर होते. हा नियोजित हल्ला होता. याचा तपास व्हावा. त्याचबोबर जरांगेंना बदनाम करण्याचा कट मातोश्रीवर शिजतोस का? याचीही चौकशी करा. आरोपी मातोश्री परिसरात फिरत होते. तर संजय राऊतही बोलले होते. राज्यात दंगली घडतील. त्या याच आहेत. अस आरोप राणेंनी केला आहे.
Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
त्याचबरोबर यावेळी त्यांनी राऊतांच्या पीएम केअर फंडावरील टीकेला देखील उत्तर दिले ते म्हणाले की, ऊद्धव ठाकरे दिल्लीत जायचे तेव्हा थाय मसाज खायला जायचे का? तुझा मालक मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं, राज्याला काय मिळावं यासाठी तो कधी दिल्लीला गेला का? 10 जनपथला कीती भांडी धूतली. तिथे जी मम्मी बसलीये तिथे किती पाया पडला याची माहीती द्यायला भाग पाडू नका. पीएम केयरवर टिका करतो. तुझा मालक सीएम होता. तेव्हा का कारवाई चौकशी लावली नाही?
गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यात पुन्हा वाढत चालले आहे. आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.