Download App

केंद्रीय मंत्री मोठा की सचिव मोठा? कांदा प्रश्न बैठकीत उपस्थितांना पडला प्रश्न

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी )

मुंबई : कांदा व्यापाऱ्यांनी निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ कांदा खरेदी बंद केली आहे. कांद्याचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

लवकरच अवतरणार लावणी किंग आशिष पाटील यांची ‘सुंदरा’

यामध्ये राज्यसरकारने तातडीने व्यापाऱ्यांसोबत बोलणी केली. पण यामध्ये केंद्रिय सचिव नसल्याचे कारण देत कुठलाही निर्णय झाला नाही. आता २९ सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री अब्दुल सत्तार.

World Cup 2023: विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, तमीम इक्बालला डच्चू

त्याचबरोबर आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, राहुल अहीर, नितीन पवार, दिलीप बनकर, अॅड. माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, कृषी आयुक्त सुनील चव्हाण (व्हीसीद्वारे), नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा (व्हीसीद्वारे) पणन महामंडळाचे संचालक केदारी जाधव, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, काय असणार खास? जाणून घ्या…

नाफेड नाशिकचे अधिकारी निखिल पाडदे, नाफेड मुंबईचे अधिकारी पुनीत सिंह, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश डमावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापू देवरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, यज्ञेश कडासी, तसेच नांदगाव, उमराणा, येवला, देवळा, लासलगाव, पिंपळगाव या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी असा मोठा लवाजमा घेऊन बैठक सुरु झाली.

भारत माता की जय…बावनकुळेंनी थांबवलं, मोदी मोदी म्हणा…बावनकुळेंच्या भोवती नवा वाद !

या बैठकीपूर्वी दुपारी अजित पवार यांची व्यापारी यांच्यासोबत बैठक झाली. त्यात निर्णय न झाल्याने केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुंबईत असल्याने त्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला. संध्याकाळी ही बैठक झाली. कांदा व्यापाऱ्यानी निर्यात शुल्क, आडत, परराज्यातील अडतीचे पद्धत, त्यात काहींनी एक देश एक अडत कायदा याच्याही भूमिका मांडल्या. पियुष गोयल यांनी या सर्व भूमिका ऐकून घेतल्या. आता काही निर्णय होईल. संपावर तोडगा निघेल अशी सर्वांची अपेक्षा होती.

डॉन अरुण गवळीची संचित रजा मंजूर, 28 दिवसांसाठी कारागृहाबाहेर

यात केंद्रीय मंत्री यांनी कुठलाही निर्णय दिला नाही. केंद्रीय सचिव वैथकीला उपस्थित नसल्याने निर्णय झाला नाही. आता 29 सप्टेंबरला दिल्लीत ही बैठक होणार आहे. सचिव असा बैठकीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. बैठकीनंतर मिळालेल्या उत्तरामुळे बैठक संपल्यानंतर सर्वच उपस्थितांचे चेहऱ्यावरील हावभाव बरच काही बोलून गेले. त्यात एका नेत्याची प्रतिक्रिया बोलकी होती. अरे केंद्रीय मंत्री मोठा असतो की सचिव मोठा असतो?

Tags

follow us