Download App

PM मोदींचा एकेरी उल्लेख; शेलारांनी कडक शब्दांत दिला इशारा, म्हणाले…

पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला तर आज विनंती करतोयं, उद्या सडेतोड अपमान करणार, अशा कडक शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरुन आशिष शेलारांनी इशारा दिला आहे.

बावनकुळेंकडून कोंडी, रविंद्र चव्हाणांचा हस्तक्षेप : निलेश राणेंच्या निवृत्त नाट्याची पडद्यामागील स्टोरी

पुढे बोलताना शेलार म्हणाले, यापुढे पतंप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करु नका, आज विनंती करतोयं नाहीतर पुढील काळात भाजपच्या लोकांनी तुमचा सडेतोड अपमान केला तर वाईट वाटून घेऊ नका, असा इशाराच आशिष शेलार यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

तसेच पंतप्रधान मोदींच्या कुटुंबांवर बोलण्याआधी तुमच्या कुटुंबात काय चालू आहे? तुमच्या सख्या भावाशी तुमचं सख्ख्य आहे का? वेगळे राहता… उद्धवजी तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल का? वडीलांच्या संपत्तीसाठी सख्ख्या भावासोबत तुम्ही भांडणे केलीत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी यावेळी केली आहे.

‘आता वेळ नाही तर टोकाचं उपोषण’; ‘थोडा वेळ द्या’ म्हणणाऱ्या महाजनांना सुनावलं

राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात आणि ते झालेच पाहिजे. आम्ही पातळीला पातळीनेच उत्तर देऊ, खालच्या पातळीवर उद्धव ठाकरे बोलाल तर त्याच पातळीवर भाजपचा नेता तुम्हाला उत्तर देईल. मग वाईट वाटले बोलू नका, असंही मोदींच्या एकेरी उल्लेखावरुन शेलारांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीला शासनाकडून ‘दोन’ महिन्यांची मुदतवाढ

आम्हाला कोणाच्या घरात जायचं नाही :
तुम्ही कुटुंबाचा विषय काढाल, तर तुम्हीला प्रतिप्रश्न जास्त येतील. पतप्रधानांच्या कुटुंबावर बोलण्याआधी तुम्हाला याची उत्तर द्यावी लागेल की, तुमच्या कुटुंबात काय चालू आहे. तुमच्या सख्या भावाशी तुमचे सख्खे आहे का? का वेगळे राहता.

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!

उद्धवजी याचे उत्तर देऊ शका? स्वत:च्या वडिलांच्या संपत्तीसाठी तुम्ही भावासोबत कोर्टात तुम्ही भांडण केले की नाही केले. आम्हाला कोणाच्या घरात जायाचे नाही. पण कुटुंबाचा विषय तुम्ही काढलात, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

Tags

follow us