Sanjay Raut News: शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. (Sanjay Raut criticism) या कोंबड्या अगोदर कापले जाणार आहेत. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नसल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
तसेच त्यांच्या पक्षाच्या तक्रारी बद्दल मी कशाला बोलू, (The Diary of Maharashtra) ‘द डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार’ हा सिनेमा आम्ही बनवतोय. ही डायरी ती डायरी ही स्टोरी आता खोका स्टोरी सुद्धा यायला हवी. विवेक अग्निहोत्री आणि केरला स्टोरीच्या डायरेक्टरला मी ही स्टोरी दिली. खोका स्टोरी ही एक हिस्टॉरिकल सिनेमा बनेल यामध्ये माणसं कमी आणि खोके जास्त असतील, अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे.
नव्या संसदेचे उद्घाटन यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) विषय नाही, हा विषय भारतीय लोकशाही आणि संविधानाचा आहे. नैतिकतेचा हा विषय आहे. उठ सूट सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि याचिका दाखल करायची, हा विरोधासाठी विरोध नाही हा विरोध आहे. राष्ट्रपती आणि संविधानाच्या सन्मानासाठी निमंत्रण पत्रिका बघितली तर उपराष्ट्रपतींचे नाव सुद्धा नाही, राष्ट्रपतींना निमंत्रण तर द्या. राष्ट्रपतींना का नाही बोलावलं त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. हा कुठलाही खाजगी कार्यक्रम नाही हा देशाचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय कार्यक्रम आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केले आहे.
तसेच पंतप्रधानांनी समोर येऊन या संदर्भात बोलले तर पाहिजे, अमित शहा म्हणतात ते बरोबर आहे. सगळ्यांना निमंत्रण मिळालं आहे, मला सुद्धा खासदार आहे म्हणून निमंत्रण आला आहे. मोठ्या माणसांच्या घरी लग्न असेल तर गावभर बोलवलं जातं, जेवण आहे कॉकटेल डिनर आहे, म्हणून त्यांच्या लोक गावभर फिरतात आणि निमंत्रण देतात. लालकृष्ण अडवाणी यांचा आयुष्य या संसदेत गेलं त्यांच्यामुळे भाजपला अच्छे दिन मिळाले ते आडवाणी कुठे गेले ? मायावतींना जायचं असेल तर त्यांना जाऊ द्या त्या कुठे विरोधी पक्षांमध्ये आहेत. नवीन संसद भवनाला कोणी विरोध करत नाही आहे. राष्ट्रपतींना बोलावलं नाही याला विरोध आहे. भाजपाचं कसं फक्त आम्ही आणि आम्हीच आहे. आम्हीच सगळं ठरवणार असं आहे.
Nitesh Rane : ‘मविआचं दुकान बंद होणार?’ उध्दव ठाकरेंच्या आमदारांचा ‘तो’ Video व्हायरल
यावेळी भाजप या कोंबड्या अधीही कापेल, असे वक्तव्य देखील संजय राऊतांनी केले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाची लोकसभेसाठी तयारी सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी २२ ते २३ जागांची मागणी केली आहे. या सर्वांवर सुरु आसेल्या चर्चेवर संजय राऊतांनी जोरदार टीका करत शिंदे- फडणवीस सरकारवर तोंडसूख घेतले आहे. तसेच पुढे त्यांनी म्हणाले की, निमंत्रण पत्रिकेत उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांचं नावच नाही त्यांना निमंत्रण तरी द्या. का नाही बोलवत यावर कोणी बोलायला तय्यार नाही. हा फक्त एका पक्षाचा कार्यक्रम आहे की देशाचा कार्यक्रम आहे, असा सवाल राऊतांनी यावेळी भाजपला विचारला आहे.