Download App

Ram Charan ने मुलगी क्लिन कारासोबत साजरा केला पहिला फादर्स डे

Ram Charan : टॉलिवूडचा (Tollywood) सुपर स्टार राम चरणने (Ram Charan) आज त्याची मुलगी क्लिन कारासोबत (Klin Kaara) फादर्स डे (Father's Day

  • Written By: Last Updated:

Ram Charan : टॉलिवूडचा (Tollywood) सुपर स्टार राम चरणने (Ram Charan) आज त्याची मुलगी क्लिन कारासोबत (Klin Kaara) फादर्स डे (Father’s Day 2024) साजरा केला आहे. राम चरणने आज मुलगी क्लिन कारासोबत एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फादर्स डे निमित राम चरण म्हणाला, क्लिनच्या जन्मानंतर पहिले सहा महिने मला काही विशेष वाटले नाही, फक्त जबाबदारीची जाणीव आणि कुटुंबात एक नवीन सदस्य आमच्यात सामील झाला आहे असं मला वाटत होते. मात्र मी आई आणि मूल यांच्यातील संबंध पाहून मी थक्क झालो. ते नाते खूप खास आहे मात्र मला त्यांच्याशी जुडता येत नव्हते मग मी माझ्या एका मित्राशी बोललो, त्याने सांगितले की, असे घडणे सामान्य आहे माझ्या सबोत देखील असच होत होते. मला माझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या सुमारे एक वर्ष असं वाटत होतो.

राम चरण पुढे म्हणाला मात्र आता क्लिन जेव्हा सर्वांना ओळखत आहे. जेव्हा मी घरी नसतो तेव्हा ती मला मिस करते त्यामुळे मला त्याची खूप सवय झाली आहे. मी आता त्याच्याभोवती माझ्या कामाचे वेळापत्रक आखत आहे. सध्या मला तिच्यासोबत एकही क्षण चुकवायचा नाही. मी 15 वर्षे खूप मेहनत केली आहे आणि आता मला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी परतायचे असतो आणि ही बाब मी माझ्या निर्मात्यांना ही सांगतो. जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा मला कामावर जावंसं वाटत नाही. असं देखील राम चरण म्हणाला.

तसेच तो म्हणाला की, मी क्लिनला दिवसातून किमान दोनदा खायला घालतो, मला ते करायला खूप आवडते. मी तिच्यासोबत माझे वाचनही करतो. जेव्हा क्लिनला खायला घालण्याचा प्रश्न येतो तेव्हा माझ्यापेक्षा कोणीही चांगले असू शकत नाही असं मला वाटते. राम चरण यांचेही मत आहे की, आजच्या काळात कृतीशील पिता होणे अत्यंत गरजेचे आहे.

तो म्हणला , “मुलाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांत, त्यांना सुरक्षिततेची भावना देणे खूप महत्वाचे आहे, जिथे त्यांना असे वाटते की त्यांची काळजी घेतली जात आहे आणि दुर्लक्ष केले जात नाही. ही त्यांची पायाभूत वर्षे आहेत, जर आपण आता याकडे लक्ष दिले तर नंतर हे सवयींमध्ये बदलू शकते म्हणून, मी त्याला खेळायला घेऊन जातो, त्याच्याबरोबर पोहण्याच्या क्लासला जातो जेणेकरून आम्ही जास्त वेळ एकमेकांसोबत राहू शकतो.

पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पुढे ढकला… खासदार लंकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

वर्क फ्रंटवर, रिपोर्ट्सनुसार, राम चरणने अलीकडेच आंध्र प्रदेशमध्ये शंकर दिग्दर्शित गेम चेंजरच्या शूटिंगचा शेवटचा टप्पा पूर्ण केला होता. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज