राम चरणच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट; Game Changer चं पहिलं वहिलं गाणं रिलीज

राम चरणच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट; Game Changer चं पहिलं वहिलं गाणं रिलीज

Game Changer : राम चरण (Ram Charan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) ‘गेम चेंजर’ (Game Changer Movie) चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या दोन्ही चित्रपटांची शूटिंग सुरू असून आज अभिनेता रामचरण च्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांकडून त्याच्या चाहत्यांना खास भेट देण्यात आली. ही भेट म्हणजे गेम चेंजर या चित्रपटाचे पहिले वहिलं गाणं रिलीज करण्यात आले.

‘नाशिक लोकसभा मतदारसंघ आमचाच’; हेमंत गोडसेंनी ठणकावूनच सांगितलं

आज रामचरण आपल्या वाढदिवसानिमित्त पत्नी उपासना आणि मुलीसह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं. त्यानंतर हे गाणं रिलीज करण्यात आलं. जरागंडी असा या गाण्याचे नाव आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गेम चेंजर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट एक तेलुगु पॉलिटिकल ड्रामा आहे.

सोलापुरात ट्विस्ट! अमोल कोल्हेंनी घेतली मोहिते पाटलांची भेट, म्हणाले, ‘ये तो ट्रेलर है..,’

चित्रपटातील जरागंडी हे पहिलं गाणं तेलगू आणि हिंदीमध्ये देखील रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यांमध्ये कियारा आडवाने आणि रामचरण यांच्या खास डान्स स्टेप्स चाहत्यांना पाहायला मिळत आहे. ‘गेम चेंजर’ ची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही किंवा निर्मात्यांनी कोणतेही पोस्टर किंवा टीझर रिलीज केलेला नाही.

बच्चू कडू अन् भाजप नेत्यांना गाफील ठेवत नवनीत राणांची बाजी; सातव्या यादीत उमेदवारी जाहीर

सध्या विशाखापट्टणममध्ये ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरून व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये कियारा क्रीम ब्लाउजसह निळ्या रंगाची बनारसी साडी परिधान करताना दिसत आहे. कपाळावर बिंदी घातलेली आणि केस पोनीटेलमध्ये बांधलेली ही अभिनेत्री अतिशय साध्या आणि फॉर्मल लूकमध्ये दिसली.

राम चरणच्या लूकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये, अभिनेता फिकट गुलाबी रंगाचा शर्ट, फॉर्मल पँट आणि शूज परिधान केलेला दिसतो. राम चरणने रिमलेस चष्म्यांसह आपला लूक पूर्ण केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज