बच्चू कडू अन् भाजप नेत्यांना गाफील ठेवत नवनीत राणांची बाजी; सातव्या यादीत उमेदवारी जाहीर

बच्चू कडू अन् भाजप नेत्यांना गाफील ठेवत नवनीत राणांची बाजी; सातव्या यादीत उमेदवारी जाहीर

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील अमरावती मतदारसंघासाठी बच्चू कडू आणि भाजप नेत्यांना देखील गाफील ठेवत नवनीत राणा ( Navneeet Rana ) यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सातव्या यादीमध्ये अखेर नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

`आम्ही फडणविसांना ओळखत नाही! रणजितसिंह मोहितेंनी ८ मे पर्यंत घरात यायचं नाही`

महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला होता. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा (Navneet Rana) इच्छुक होत्या. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला होता. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली होती. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढू असा इशारा शिंदे गटाने दिला होता. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी गर्जना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती.

Anushka Sen : अभिनेत्री अनुष्का सेननं दिला हॉटनेसचा तडका

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube