अमरावतीचा तिढा वाढला, राणांच्या उमेदवारीला कडूंचा विरोध; नाराजी दूर करण्यासाठी CM शिंदेंची मध्यस्थी

अमरावतीचा तिढा वाढला, राणांच्या उमेदवारीला कडूंचा विरोध; नाराजी दूर करण्यासाठी CM शिंदेंची मध्यस्थी

Bachchu Kadu : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा (Navneet Rana) इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढू असा इशारा शिंदे गटाने दिला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी गर्जना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे.

आता तर त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत या वादाला आणखीच धार दिली आहे. अमरावतीतून उमेदवार देण्याची घोषणाच कडू यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर महायुतीला हादरे बसू लागले. डॅमेज होण्याआधीच कंट्रोलची भूमिका घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंन बच्चू कडूंना भेटीचे निमंत्रण पाठवले होते. त्यानुसार बच्चू कडू मुंबईला रवाना झाले असून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत.

अमरावतीचा तिढा! शिंदे गटाचा दावा, रवी राणांचाही NDA नेत्यांना सज्जड दम

नवनीत राणा यांना आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही. त्यांनी जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची मानसिकताच नाही. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ. अमरावती लोकसभा मतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते आहेत. खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता. पण, आम्हाला प्रामाणिकपणे काम करणं हे थोडं अंगलट येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडं अडचणीत येतो. मात्र, गरज पडल्यास अमरावतीतून प्रहारचा उमेदवार देऊ, असं कडू म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर अमरावतीचा तिढा अधिकच वाढल होता. आधीच माजी खासदार अडसूळ यांच्या दावेदारीने महायुती जेरीस आली होती. त्यानंतर कडूंनीही नाराजी दाखवल्याने अडचणी वाढल्या होत्या. हा वाद अधिक वाढायला नको यासाठी तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आज बच्चू कडू आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होईल. या भेटीत अमरावती मतदारसंघाबाबत चर्चा होईल. या बैठकीत काय तोडगा निघतो? मुख्यमंत्री शिंदे बच्चू कडू यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘अजितदादा अन् शिंदेंचे उमेदवार ‘कमळावर’च लढणार’ बच्चू कडू यांचा मोठा दावा

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube