माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आता लोकायुक्त सदस्य; भ्रष्टाचारावर राहणार करडी नजर

Rashmi Shukla-राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Rashmi Shukla

Rashmi Shukla

Rashmi Shukla : राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर आता नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची लोकायुक्तच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. (Rashmi Shukla Lokayukta Member Former Maharashtra DGP)

Mansoon : अडकलेल्या ‘मान्सून’ची तारीख ठरली! शेतकऱ्यांनो चिंता सोडा, पेरणीला लागा…

लोकायुक्त ही न्यायिक संस्था आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर सुनावणी आणि कारवाई करण्याचा अधिकार लोकायुक्तांना आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यात हा सुधारित कायदा झाला आहे. हजारे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात लोकायुक्त कार्यरत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करत महत्त्वाचे पाऊल उचलले.2024 मध्ये राज्यात लोकायुक्तपदाची नियुक्ती करण्यात आली होती. पण संस्थेचे इतर सदस्य आणि संबंधित पदांवरील नियुक्त्या रखडल्याने पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू होऊ शकले नव्हते. त्यानंतर आता सदस्य नियुक्त केले जात आहे.

संविधानकर्ते अन् नेहरूंनाही जमलं नाही ते मोदींनी केलं; आमदार प्रमोद जठरांचं मोठं वक्तव्य

शुक्ला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. त्याजानेवारी 2026 मध्ये पोलीस महासंचालकपदावरून निवृत्त झाल्या आहेत.


फोन टॅपिंगप्रकरणात आल्या होत्या अडचणीत

शुक्ला यांच्यावर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप झाला होता. परंतु सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द केले होते. मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास जवळच्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.

Exit mobile version