Download App

संजय राऊत हे ‘सिल्व्हर ओक’चे दलाल, शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Naresh Mhaske on Sanjay Raut : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यांच्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना ‘सिल्व्हर ओक’ने (Silver Oak) भूंकण्यासाठी ठेवले आहे, अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

नरेश म्हस्के म्हणाले की संजय राऊत हे ‘सिल्व्हर ओक’ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोज सकाळी भूंकण्यासाठी नेमलेला माणूस आहे. त्यांना काय अधिकार आहे शिवसेनेला भाडोत्री म्हणण्याचा? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला आहे.

‘फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी अन् खोटेनाटे दावे’; थोरातांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

संजय राऊत हे काँग्रेस-राष्ट्रवादीने बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार संपवण्याकरता आणि शिवसेनेपासून अलिप्त करण्यासाठी नेमलेला दलाल आहे. त्यांना ‘सिल्व्हर ओक’चे दलाल म्हणायला पाहिजे, अशी टीका म्हस्के यांनी केली आहे. उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करत होते त्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर नेण्याचे काम केले आहे. ही त्यांची दलाली आहे. त्यांना दलाल म्हणून नियुक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांना मूळ विचारांपासून बाजून करण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

Tags

follow us