‘फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी अन् खोटेनाटे दावे’; थोरातांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

‘फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी अन् खोटेनाटे दावे’; थोरातांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

Balasaheb Thorat criticized Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले.

सांगलीमध्ये आज काँग्रेसचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) उपस्थित होते.

काँग्रेसचं ‘टार्गेट’ सांगत पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘टॉनिक’; मित्रपक्षांनाही दिला इशारा

या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच आगामी निवडणुकीत या सरकारला घरी बसविण्याचे आवाहन लोकांना केले. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले.

या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज ऊर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, मधुकरराव चव्हाण, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आ. डॉ. विश्वजीत कदम, मोहन कदम, आशिष दुआ, विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, आ. विक्रम सावंत, डॉ. धवलसिंह पाटील आदींसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

BJP : आजचे निवडणूक प्रमुख हेच उद्याचे उमेदवार? बावनकुळेंनी इच्छुकांना दिला सूचक संदेश

भ्रष्ट सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा – सिद्धरामय्या

भाजप जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube